शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:32 IST

केरळमध्ये बसमध्ये मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

kerala Bus Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. रोज महिलांवरील अत्याचाराची, विनयभंगाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असतानाही महिलांच्या शोषणाचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दुसरीकडे मात्र आता महिलांकडे महिलाही आता अशा प्रकारांचा विरोध करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. अशीच एक घटना केरळमध्ये धावत्या बसमध्ये घडली. बसमध्ये एक वयस्कर व्यक्ती एका मुलीचा विनयभंग करत होता मात्र तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला आणि त्या व्यक्तीला सर्वांसमोर धडा शिकवला.  

केरळमधील बसमध्ये एका पुरुष मुलीची छेडछाड करतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मुलीच्या मैत्रिणीने संपूर्ण घटना रेकॉर्ड केली आणि त्या पुरूषाला जागीच धडा शिकवला. मुलीच्या मैत्रिणीने त्या व्यक्तीच्या जोरदार कानाखाली मारली आणि त्याला त्याच्या घाणेरड्या कृत्याबाबत जाब विचारला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना आजूबाजूचे प्रवासी शांतपणे बसून होते. प्रवाशांनी काय घडत आहे हे पाहिले सुद्धा नाही. मात्र त्या मुलींनी धैर्य दाखवत त्या व्यक्तीचा समाचार घेतला.

दोन मुलींच्या शेजारी हा व्यक्ती बसला होता. त्यावेळी मध्ये बसलेल्या मुलीला तो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने स्पर्श करुन घाणेरडे कृत्य करत होता. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद करुन त्याला जाब विचारण्याचं ठरलं. त्यानंतर दुसऱ्या मुलीने उठून थेट त्या व्यक्तीच्या थोबाडीत लगावली. व्हिडीओमध्येमुलगी मल्याळम भाषेत त्या पुरूषाला शिवीगाळ करताना दिसत आहे आणि आरोपी हात जोडून माफी मागताना दिसत आहे. मुलीने कानाखाली मारताच त्या व्यक्तीचा चष्मा उडून पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, त्या व्यक्तीवर काय कारवाई झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मात्र मुलींनी दाखवलेल्या सजगपणामुळे त्या व्यक्तीला चांगलीच शिक्षा मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळPoliceपोलिस