शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आई की वैरीण! मुलीला घरातच विसरून बर्थ डे पार्टी करायला गेली आई, सहा दिवसांनी परतली तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:03 IST

जेव्हा ती सहा दिवसांनी घरी परतली तेव्हा तिला मुलगी मृत आढळून आली. या महिलेला आता कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाऊ शकते.

ब्रिटनमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. एखादी आई हलगर्जीपणाची इतकी सीमा कशी पार करू शकते असा प्रश्न लोकांन पडला होता. ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर सत्य आहे. १८ वर्षाची झाल्यानिमित्त एक महिला आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. पण या सगळ्यात ती तिच्या मुलीला घरीच विसरून गेली. जेव्हा ती सहा दिवसांनी घरी परतली तेव्हा तिला मुलगी मृत आढळून आली. या महिलेला आता कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाऊ शकते.

ब्रिटनच्या ईस्ट ससेक्समधील ब्रायटनची ही घटना आहे. ही घटना डिसेंबर २०१९ मध्ये घडली होती. इथे राहणारी वेर्फी कुदी नावाची महिला तिचा १८वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेली. पण आपल्या मुलील घरीच विसरून गेली. ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यात इतकी बिझी होती की, तिला तिच्या मुलीची जराही काळजी वाटली नाही. 

सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं की, महिला पूर्ण सहा दिवसांनी घरी परतली. तिने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगितले की, तिची मुलगी काहीच हालचाल करत नाहीये. द सनच्या रिपोर्टनुसार, ससेक्स पोलिसांनी कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केलं आहे. ज्यात वेर्फी कुदी लंडन कोवेंट्री आणि सोलीहुलमध्ये पार्ट्या करताना दिसत आहे.

सोबतच अशीही माहिती मिळाली की, जेव्हा ती सहा दिवसांनी घरी परतली तेव्हा तिने ९९९ वर कॉल केला. तिने सांगितले की, तिची मुलगी उठत नाहीये. त्यानंतर ती मुलीला घेऊन एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला मृत  घोषित करण्यात आले.

मुलीच्या मृत्यूनंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. ज्यात समोर आलं की, मुलीचा सांभाळ व्यवस्थित न केल्याने तिचा मृत्यू झाला. ४ ते १२ डिसेंबरपर्यंत मुलगी घरात एकटीच होती. तिचा सांभाळ कुणी केला नाही. ज्यामुळे तिची तब्येत बिघडली होती. तेच महिला वेर्फी कुदीने कोर्टात तिच्यावरील आरोप मान्य केले आहेत आणि आता कोर्ट तिला शिक्षा देणार आहे. इतके दिवस ही केस कोर्टात सुरू होती. 

टॅग्स :LondonलंडनCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी