शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"फक्त माझ्यासाठी नाही वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; युएईमध्ये मुलीला संपवून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:36 IST

केरळच्या एका महिलेने मुलीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३३ वर्षीय केरळच्या महिलेच्या आणि तिच्या मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली. विवाहितीने तिच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली. हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ सहन न झाल्याने पीडितेने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी लिहिले चिठ्ठीमध्ये पीडितेने सगळ लिहून ठेवलं होतं. महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर केरळमधील कुंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती कुत्र्यासारखी मारहाण करायचा, अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडायचा असं पीडितेने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.

कोल्लमची रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय विपंचिका मणीने ८ जुलै रोजी शारजाहच्या अल नहदा भागातील तिच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या दीड वर्षांची मुलगी वैभवीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. त्यानंतर आता विपंजिकाचा पती निधिशला पहिला आरोपी, त्याची बहीण नीथूला दुसरा आरोपी आणि वडिलांना तिसरा आरोपी बनवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात दिलेला हुंडा पुरेसा नाही असे म्हणत आरोपींनी विपंजिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

सासरच्या लोकांनी तिचे केस कापले जेणेकरून ती कुरूप दिसावी कारण ती गोरी होती. विपंजिकाला घटस्फोटाची नोटीसही पाठवण्यात आली होती. तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल तिला मारहाण करण्यात आली होती. विपंजिकाने लिहिलेल्या एका चिठ्ठीत पतीच्या घरी झालेल्या क्रूर छळाचा उल्लेख आहे. सासऱ्यांनी माझ्यावर अत्याचार केले आणि जेव्हा तिने तिच्या पतीला याबद्दल सांगितले. तेव्हा त्याने काहीही केले नाही आणि त्याने म्हटलं की वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं आहे.

"मी त्यांचा छळ शांतपणे सहन करत होते. ते म्हणायचे की लग्न भव्य नव्हते, हुंडा कमी होता आणि त्यात गाडीही नव्हती. ते मला बेघर, कंगाल म्हणायचे आणि म्हणायचे की मी भीक मागून जगते. त्यांच्याकडे पुरेसे पैसे असूनही, ते माझ्या पगारासाठी मला त्रास देत होते. तो काही व्हिडिओ पाहायचा आणि मला ते बेडवर तसेच  करण्याची मागणी करायचा. तसे केलं नाही तर तो निर्दयीपणे मारहाण करायचा," असं विपंजिकाने म्हटलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळPoliceपोलिसdowryहुंडा