वाडा - तालुक्यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे (26) व कोने येथील धिरज नरेश अधिकारी (22) या दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ठाकरे हा विवाहित तरुण असून दीड महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता विशाल याने आजारपणास कंटाळून व मानसिक तणावाखाली राहून सकाळच्यादरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर कोने येथील धीरज अधिकारी या तरुणानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. धिरज याच्या आत्महत्तेचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. तरुणांच्या अशा वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे पालकवर्ग चिंताग्रस्त असून तालुक्यात या आत्महत्यांचीच चर्चा सुरु आहेत.
खळबळजनक! विष पिऊन दोन युवकांनी केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:41 IST
एकाच दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
खळबळजनक! विष पिऊन दोन युवकांनी केली आत्महत्या
ठळक मुद्देवाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ठाकरे हा विवाहित तरुण धीरज अधिकारी या तरुणानेही विष प्राशन करून आत्महत्या केली.