शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडवून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:41 IST

पत्नी नांदण्यास येत नसल्याने चिडून पोटच्या दोन वर्षांच्या मुलाचा उजनीच्या पाण्यात बुडवून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी कुंभारगाव येथे घडली.

भिगवण - पत्नी नांदण्यास येत नसल्याने चिडून पोटच्या दोन वर्षांच्या मुलाचा उजनीच्या पाण्यात बुडवून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) सकाळी कुंभारगाव येथे घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खुनशी पित्याने चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याने कुंभारगावात नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे ठाणेअंमलदार अनिल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल शिवाजी धुमाळ (वय २०, रा. कुंभारगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोमल आणि शिवाजी धुमाळ यांचा विवाह २०१५मध्ये झाला होता. तसेच त्यांना ऋतेश हा दोन वर्षांचा मुलगा होता. कोमल पतीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून मुलाला घेऊन माहेरी राहत होती.या दोघांचे घटस्फोट प्रकरण न्यायालयात आहे. काही दिवसांपासून शिवाजी हा पत्नीस माहेरी राहण्यास येण्यासाठी त्रास देत होता. तसेच, पत्नी माहेरी न आल्यास तिला व तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकीही देत होता.दोन महिन्यांपूर्वी न्यायालयातील तारखेला बारामतीला आले असता ‘मुलाला माझ्याकडे सांभाळण्यास दे, नाही तर तुला मारून टाकतो,’ अशी धमकी दिल्याने कोमल हिच्या आई-वडिलांनी ऋतेशला वडील शिवाजीच्या ताब्यात दिले होते.रविवारी सकाळी शिवाजी हा मुलगा ऋतेश याला दुचाकीवर बसवून कोमल हिच्या घरी येऊन ‘तू जर आज नांदण्यास आली नाही, तर तुला हा कधीच जिवंत दिसणार नाही,’ असे म्हणत उजनीच्या दिशेने निघून गेला. उजनीच्या जॅकवेलमध्ये मुलाला टाकून दुचाकी पडल्याचा बनाव करीत मुलगा बुडाल्याचे गावातील नागरिकांना त्याने सांगितले.या वेळी नागरिकांनी मुलाला बाहेर काढून उपचारांसाठी भिगवण येथील खासगी दवाखान्यात आणले मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत फिर्याद दाखल होताच भिगवण पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केले.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भानुदास पवार, पोलीस हवालदार अनिल सातपुते, विलास मोरे, नवनाथ भागवत हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे