शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:51 IST

Murder Case : हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील गोविंदपुरी भागात ६ जुलैच्या रात्री डीटीसी बस चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून मृताच्या मुलीसह दोन पत्नींना अटक करण्यात आली. हत्येनंतर दोन्ही पत्नींना मालमत्ता आपापसात वाटून घ्यायची होती. नजमापासून गीता झालेल्या दुसऱ्या पत्नीने या हत्येसाठी लहान भावाला 15 लाखांची सुपारी दिली होती. हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनीअटक केली आहे. चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

चौकशीदरम्यान, शूटर नईमने पोलिसांना सांगितले की, त्याला मृताची पत्नी नजमा उर्फ ​​गीता हिचा चुलत भाऊ इक्बाल याच्यामार्फत संजीव कुमारच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली होती. मृत संजीव कुमार याच्या मुलीने त्यांच्या खात्यात 20 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. खून करण्यासाठी तो मित्र मनीषसोबत दिल्लीत आला होता. लाजपत नगरमध्ये राहणाऱ्या मनीषच्या चुलत भावाची दुचाकी घेऊन आला होता. 6 जुलै 2022 रोजी संजीवचा दुचाकीवरून पाठलाग करून दीपालय शाळेजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. झारखंडमधील गोड्डा येथील जमुनी पहारपूर येथे राहणारा 38 वर्षीय नईम अन्सारी 9वीपर्यंत शिकला आहे. तो गुजरातमधील वलसाड येथे शिंपी म्हणून काम करत असे.

शूटर नईम दिल्लीतून झारखंडला पळून गेला होतापोलिसांनी शूटर नईम अन्सारीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता तो दिल्लीहून झारखंडला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. टीम झारखंडला पोहोचली आणि मेहनतीनंतर नईमला पकडले. यावेळी ग्रामस्थांनी तेथे जमा होऊन छापा टाकणाऱ्या पथकाला घेराव घातला. त्यांनी आंदोलन सुरू करून बाहेर पडण्याचा मार्ग अडवला.नईम अन्सारीची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पथकातील सदस्यांनी गाड्या मागे वळवल्या. गावकऱ्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली, पण कोणतीही जीवितहानी न होता पथक बाहेर पडले.आरोपीला झारखंड न्यायालयातून ट्रान्झिट रिमांडवर घेऊन दिल्लीत आणण्यात आले.डीटीसी बस चालक संजीव कुमार यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पहिली पत्नी ४२ वर्षीय गीता, २१ वर्षीय कोमल, २८ वर्षीय गीता देवी उर्फ ​​नजमा गोविंदपुरी यांना पोलिसांनी पकडले होते. कोमल ही मृत संजीव यांची पहिली पत्नी गीता यांची मुलगी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक