शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:43 IST

त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगर - मोटारसायकल चोरून त्यातील पेट्रोल संपेपर्यंत चालविण्याची हौस करणाऱ्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

उल्हासनगरात किमान दोन ते तीन मोटारसायकली चोरीच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल आकाश गायकवाड याच्या ताब्यात असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी आकाश गायकवाड याला जेरबंद केल्यानंतर त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. रस्त्यावर मोटारसायकल दिसताच ती चोरून आपली हौस पूर्ण होईपर्यंत चालवून झाल्यानंतर बेवारस स्थितीतच मोटारसायकल सोडून द्यायची. यामध्ये त्याचा मित्र बिनसेन मोतीस सहभागी असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आकाश व बिनसेन मोतीस त्यांच्याकडून १० मोटारसायकली व १ रिक्षा हस्तगत केल्या आहे.

विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, बिनसेन हा मोटारसायकलचा शौकीन असून मोटारसायकल चालवण्याचा छंद होता. मोटारसायकलचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने आकाशच्या मदतीने चोरीचा सपाटा लावला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार किमतीच्या १० मोटरसायकल १ रिक्षा जप्त केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmotercycleमोटारसायकलRobberyदरोडाulhasnagarउल्हासनगर