शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तिजोरीतील लाखो रुपये गायब; दोन संशयित कर्मचारी ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:14 IST

या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी दोन संशयित रेल्वे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देतिकीट विक्री केंद्रावर चोरट्यांनी ४५ लाख रुपयांचा डल्ला मारला होता. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे.

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस तिकीट विक्री केंद्रावर चोरट्यांनी ४५ लाख रुपयांचा डल्ला मारला होता. या प्रकरणी कुर्ला रेल्वेपोलिसांनी दोन संशयित रेल्वे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.लोकमान्य टिळक टर्मिनसवरील तिकीट विक्रीची रक्कम, तिकीट तपासनिसांनी विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम तिकीट विक्री केंद्रावर जमा केली होती. ती रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तपासाअंती रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दोघांना पकडले असून त्यांची चौकशी सुरू आहे. यासह पोलिसांकडून लोकमान्य टिळक टर्मिनस परिसराचा तपास केला जात आहे. तिकीट विक्री केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून अधिक तपास सुरू आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील प्रवाशांच्या तिकिटांचे तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिकीटघर येथील लोखंडी तिजोरीतून हे पैसे चोरीस गेले आहेत. याबाबत गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसrailwayरेल्वेArrestअटक