शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडीत चोऱ्यांचे सत्र सुरूच, एकाच रात्री दोन दुकाने, नऊ फ्लॅट फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:38 IST

महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे.बिरवाडी जुनी बाजारपेठ येथील सागवेकर ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानामधून चोरट्यांनी शटर तोडून एक लाख रुपये किमतीची चांदी, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू, असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची माहिती ज्वेलर्स मालक संदीप सागवेकर यांनी दिली आहे. बिरवाडी बापटनगर येथील शारदा कॉम्प्लेक्स, साईकृपा कॉम्प्लेक्स, श्री जय जय रघुवीर समर्थ कृपा कॉम्प्लेक्स, राजकमल बिल्डिंग, रमेश मालुसरे यांचा बंगला या ठिकाणांचा समावेश आहे.एकूण नऊ बंद सदनिका चोरट्यांच्या टोळीने फोडल्या असून, बिरवाडी मच्छीमार्केट येथील श्लोक सुपरमार्केट दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. कौस्तुभ धारिया यांच्या मालकीच्या श्लोक सुपरमार्केटच्या दुकानातील संगणकाची चोरट्यांनी मोडतोड केली आहे, या ठिकाणी फार मोठी रोख रक्कम चोरट्यांना मिळालेली नाही.वारंवार होणाºया चोरीच्या घटनांमुळे येथील नागरिक व व्यापारी रोख रक्कम, सोन्याचे दागिने हे घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवत असल्याने बंद सदनिकांमध्ये चोरट्यांना काही हाती न लागल्याने केवळ सामानाची नासधूस करून पळ काढला. खरवली येथील राजहंस सोसायटीमधूनमोटारसायकल चोरी करून ती चोरीच्या घटनांमध्ये वापरल्याचे सीसीटी कॅमेºयात निदर्शनास आले आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी घरफोडीच्या घटनेनंतर तक्रारी दाखल करून घेण्याचे काम सुरू असून, ठसे तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरीच्या घटनाक्रमावरून चोरट्यांची टोळी ही परप्रांतीय असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही चोरट्यांनी बाजारपेठेमधील बंद दुकाने सदनिकांना लक्ष्य केले होते. मात्र, पोलीस व्हॅनवरील चालक शिंगणकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मधाळे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरट्यांच्या टोळीतील साथीदारांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी ही मध्यप्रदेशातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, चोरीच्या ठिकाणी दगड, लॉक आढळून आले आहेत.पोलीस चौकी सुरू करण्याची मागणीबंद पोलीस चौकी सुरू करण्याची नागरिकांची मागणी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याने पोलीस चौकी तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अपुरे पोलीस कर्मचारी यामुळे या ठिकाणी काम करताना गुन्ह्याच्या तपासाचा मोठा ताण पोलीस कर्मचारी यांच्यावर असल्याची बाबही समोर आली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये ५५ कर्मचारी मंजूर असून, ३० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत आणि २० पदे रिक्त आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड