मडगाव - मृत व्यक्तीची जमीन गहाण ठेवून बँकेतून लाखांचे कर्ज उकळण्याची एक घटना गोव्यात उघडकीस आली आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव पोलिसांनी फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. संजय सोमण आणि संध्या सोमण अशी संशयितांची नावे आहेत. स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या मडगाव शाखेतून संशयितांनी 2009 साली साडेआठ रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी जी मालमत्ता गहाण ठेवली होती. त्याच्या मालकाचे आधीच म्हणजे 1998 साली निधन झाले होते. संशयिताने बनावट विक्रीपत्र तयार करुन बँकेला ही मालमत्ता गहाण ठेवली होती असे तपासात उघड झाले आहे.भारतीय दंड संहितेच्या 420,465,468 व 471 कलमांखाली पोलिसांनी वरील संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश गावस पुढील तपास करीत आहेत. मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. स्टेट बँक ऑफ म्हैसूर मडगाव शाखेचे मॅनेजर ग्यानेश प्रसाद हे तक्रारदार आहेत. 20 फेब्रुवारी 2009 साली संशयितांनी बँकेतून साडेआठ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठी जमीन गहाण म्हणून ठेवली होती. विक्रीपत्रही दाखविले होते. प्रत्यक्षात या जमिनीचे मालक आंतोनियो डिसोझा यांचे 1998 मध्ये निधन झाले होते. संशयितांनी गृहबांधणीसाठी कर्ज घेतले होते. संशयितांनी 7 लाख 24 हजार 845 रुपये देणो बाकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील पोलीस तपास चालू असल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली.
धक्कादायक! मृत व्यक्तीची जमीन गहाण ठेवून बँकेतून लाखोंचे कर्ज उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:27 IST
संशयिताने बनावट विक्रीपत्र तयार करुन बँकेला ही मालमत्ता गहाण ठेवली होती असे तपासात उघड झाले आहे.
धक्कादायक! मृत व्यक्तीची जमीन गहाण ठेवून बँकेतून लाखोंचे कर्ज उकळले
ठळक मुद्देमालकाचे आधीच म्हणजे 1998 साली निधन झाले होते.भारतीय दंड संहितेच्या 420,465,468 व 471 कलमांखाली पोलिसांनी वरील संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील पोलीस तपास चालू असल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली.