शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर; दोघांचा मृत्यू झाल्याने ताडी विक्री केंद्र चालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:44 IST

Crime News : मृतामध्ये ट्रॅफीक वॉर्डनचा समावेश

डोंबिवली - ताडीचे अतिसेवन दोन तरूणांच्या जीवावर बेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री 11 च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगावात घडला. सचिन अशोक पाडमुख (वय 22) आणि स्वप्नील बबन चोळखे (वय 30) अशी दोघा मृतांची नावे असून यातील स्वप्नील हा ट्रॅफीक वॉर्डन होता. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी ताडी केंद्र चालविणा-या रवी बथणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो पसार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.

सचिन आणि स्वप्नील असे दोघेजण अन्य दोघा मित्रंसमवेत पश्चिमेकडील अण्णानगर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गावदेवी मंदिर जवळ असलेल्या कोपरगावातील एका ताडी विक्री केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी सचिन आणि स्वप्नीलने ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांना त्रस झाला. त्यांची प्रकृती ढासळल्याने दोघांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतू ताडीच्या अतिसेवनामुळे त्यांच्या छातीवर दाब आला आणि त्यात हदयविकाराचा झटका येऊन दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहीत मिळताच विष्णुनगर पोलीस ताडी विक्री केंद्रावर पोहोचले. परंतू तत्पुर्वीच केंद्र चालविणारा रवी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान डोंबिवलीचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी वपोनि भालेराव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहीती घेतली. घटनेबाबत खेद व्यक्त करताना बेकायदेशीरपणो सुरू असलेल्या केंद्राबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. जास्त नशा येण्यासाठी ताडीमध्ये मोठया प्रमाणात केमिकल मिसळले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.अवैधपणे ताडीची विक्रीदरम्यान संबंधित ताडी विक्री केंद्र हे बेकायदेशीर होते. अवैधरित्या सुरू असलेल्या या केंद्राला कोणाचा आशिर्वाद होता? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित झाला आहे.ताडीच्या नमुन्यांची होणार तपासणीताडीच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू ओढावला असा अंदाज व्यक्त केला जात असलातरी त्यांनी प्राशन केलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याची माहीती वपोनि भालेराव यांनी दिली. नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

लवकरच कामावर रूजू होणार होतास्वप्नील हा 2015 पासून डोंबिवली वाहतूक विभागात कार्यरत होता. परंतू संधीवाताच्या त्रसामुळे तो दिड महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होता. लवकरच तो कामावर रूजू होणार होता. परंतू सोमवारी त्याचा मृत्यू ओढावला. विवाहीत असलेल्या स्वप्नीलच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि पाच वर्षाची मुलगी आहे. तर सचिन हा अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ बहीण आहेत. घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस