शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 17:59 IST

व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबारामती गुन्हे अन्वेषण पथकाने आणला प्रकार उघडकीस

बारामती : बारामती तालुक्यातील बड्या उद्योजकासह त्यांच्या मावस भावाच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने हा प्रकार उघड झाला आहे.बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे. संग्राम सोरटे हे मगरवाडीतील नवनाथ उद्योग समुहाचे प्रमुख आहेत.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,  सोरटे यांनी याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरवातीला जयचंद जाधव याला अटक केली.जाधव याने सचिन सोरटे याचे नाव सांगितले.त्यानंतर  त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न,कट रचणे तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. उद्योजक  सोरटे यांचे बंधू प्रवीण व संगीता नाझीरकर यांचे भागीदारीत अनेक व्यवसाय भागीदारीत होते. नाझीरकर या नगरविकास खात्याचे उपसंचालक  हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी आहेत.सोरटे व नाझीरकर कुटुंबात व्यावसायिक मतभेद झाले होते. तसेच संग्राम सोरटे यांचे चुलत चुलते श्रीपाल आप्पासो सोरटे (रा. सोरटेवाडी) आणि सचिन व विकास सोरटे यांचेही दिवाणी स्वरुपाचे दावे बारामती न्यायालयात प्रलंबित आहेत. दोघा आरोपींनी संग्राम सोरटे  यांना रिव्हॉल्व्हरने तर त्यांचे मावस भाऊ अ‍ॅड. प्रसाद खारतोडे  यांना कोयता व तलवारीने मारण्याचा कट रचला होता. उद्योजक सोरटे यांचा मगरवाडीतील बंगला, नवनाथ मिल्कचे कार्यालय, करंजेपूल येथील नवनाथ पतसंस्थेचे कार्यालय या ठिकाणी आरोपींनी रेकीही केली होती. अ‍ॅड. खारतुडे यांचा मेडद येथील शेतात जावून पाठलाग करण्यात आला होता. या घटनेचा सुगावा लागताच सोरटे व खारतुडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदीप जाधव,सुरेंद्र वाघ,स्वप्नील अहिवळे,संदीप कारंडे, पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस