शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या; २०१० मधील घटनेची आता कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 06:00 IST

पॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

- सूर्यकांत वाघमारे।नवी मुंबई : पॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. हे दोन्ही गुन्हे मुंबईच्या नेहरूनगर परिसरातील आहेत. बलात्कार केल्यानंतर त्यांच्याकडून घटनेची वाच्यता होऊ नये याकरिता त्याने हे कृत्य केले आहे.

कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात २०१० मध्ये घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. रेहान कुरेशीने या दोनही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मुलींवर बलात्कार केल्यानंतर आपले बिंग फुटू नये याकरिता त्याने गळा आवळून त्यांची हत्या करून निर्जन स्थळी मृतदेह टाकले होते. सलग तीन महिन्यांच्या कालावधीत असे चार गुन्हे घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यापैकी एक गुन्हा त्याचवेळी उघडकीस आल्याने संबंधिताला अटक झाली होती. मात्र उर्वरित गुन्हे उघडकीस आले नव्हते. अखेर आठ वर्षांनी हे गुन्हे उघडकीस आले आहेत.

त्या वेळी रेहान कुरेशी (३४) हा चुनाभट्टी परिसरात राहायला होता. त्याच परिसरात ८- १० वर्षांच्या मुलींना वासनेचे बळी पाडले होते. तेव्हा परंतु या मुलींकडून घरी वाच्यता होण्याच्या भीतीने त्याने बलात्कारानंतर त्यांची हत्या केली होती. पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी आजवर उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा नव्याने तपास सुरू केला होता. त्यानुसार नेहरूनगरच्याही गुन्ह्यांची चौकशी पोलीस करत होते. त्याकरिता रेहानचे नमुने डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रेहानने चौकशीत त्याने बलात्कार व हत्येच्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. घरातून बाहेर निघताना तो सतत गुन्ह्याच्या तयारीत असायचा. याकरिता तो अंतवस्त्रही घालत नव्हता, असे चौकशीत समोर आले.

मुंबईसह, ठाणे, पालघर व नवी मुंबई परिसरात रेहानवर पॉक्सोचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपासून या घटना घडूनही त्याच्याविषयी माहिती हाती लागत नव्हती. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा रोड परिसरातून त्याला पकडले. सध्या तो नेरुळमधील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात आहे.सोसायटीतून कुटुंबाची हकालपट्टीनवी मुंबई पोलीस मागावर असल्याची चाहूल लागल्याने रेहानचे कुटुंब मीरा रोडला वूडलँड सोसायटीत भाड्याने राहायला गेले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाअंती त्याला अटक केल्यानंतर सोसायटीला त्याच्या कृत्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोसायटीने त्यांचे घर खाली केले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारDeathमृत्यू