पिंपरी : हिंजवडी परिसरातून एका सोळा वर्षाच्या आणि एका सतरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले आहे. दोन घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. कोणीतरी फूस लावुन अल्पवयीन मुलींना पळवुन नेल आहे. अशी फिर्याद दोन्ही मुलींच्या पालकांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्यास माहितीनुसार, पुनावळेतील कोयतेवस्तीतुन १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावुन पळवुन नेले आहे. शुभम महादेव कसबे (वय २०) या तरूणावर मुलीच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. मुलीचे अपहरण झाल्याची दुसरी घटना सुसगाव (मुळशी) येथे घडली आहे. १७ वर्षाच्या मुलीला कोणीतरी काहीतरी आमिष दाखवुन पळवुन नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी हिंजवडीपोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर.आर. दिठे या दोन्ही प्रकरणी तपास करत आहेत.
हिंजवडीतुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:33 IST
हिंजवडी परिसरातून एका सोळा वर्षाच्या आणि एका सतरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले आहे.
हिंजवडीतुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
ठळक मुद्देफूस लावुन पळवुन नेल्याचा संशय या प्रकरणी मुलीच्या पालकांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल