शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकल चोरीसह पोलिसांवरही हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे आंबिवलीतून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:48 IST

Crime News : मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोड्या, वाहनचोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली.

ठाणे - मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोड्या, वाहनचोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सात मोटरसायकली आणि चार मोबाइल असा पाच लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मोटरसायकलींची चोरी केल्यानंतर त्यांचा वापर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीची जबरीने चोरी करण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील शांतीनगर, माणकोली त्यापाठोपाठ ठाणे शहरातील कळवा, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ जणांच्या एका टोळीने एकाच दिवशी मोटरसायकल चोरी करून एका पोलीस बिट मार्शलवर हल्ला झाल्याची घटना २१ मार्च रोजी घडली होती. हा तपास सुरू असताना या टोळीतील दोघे जण आंबिवलीच्या इराणीवाडीत दडून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे, अंमलदार आनंदा भिलारे, रवींद्र पाटील, रिझवार सय्यद, विक्रांत कांबळे आणि तेजश्री शेळके आदींच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडीत २७ मार्च रोजी छापा टाकून दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मोटरसायकली इराणीवाडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीस पथकाने चोरीच्या सात मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या. दोघांना अटक करून  चौकशी केली असता, आठ जणांची टोळी यामध्ये असून या टोळीने एकाच दिवशी आठ मोटरसायकली चोरी केल्याची बाब समोर आली. इतर ठिकाणीही चोरी केल्याची दिली कबुलीएक मोटरसायकल भिवंडी येथे एका पोलिसाच्या अंगावर चढविण्याच्या प्रयत्नात घसरल्यामुळे ती तिथेच टाकून या दोघांनी इतर साथीदारांच्या मोटरसायकवरून पळ काढला होता. भिवंडी, ठाणे आणि मुलुंड परिसरातून या मोटरसायकली चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली. या मोटरसायकली इराणी वाडीतील सराईत सोनसाखळी चोरांना चोरी करण्यासाठी विकणार होते अशी धक्कादायक माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आली आहे. गुन्हे शाखेने या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी