शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर परिसरात दोन लाखांचा अवैैध गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:00 IST

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी एक चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात १ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविमल पानमसाला या अवैध गुटख्याने भरलेले १२ पोते ताब्यात

लोणी काळभोर : गुटख्याची अवैध वाहतूक करणारी एक चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात १ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा व इरटिगा या चारचाकीसह एकूण ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लोणी काळभोरपोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सुमित दुर्गाप्रसाद गुप्ता ( वय २०, रा. पाटीलवस्ती,लोणीकाळभोर ता.हवेली ) याला अटक करण्यात आली आहे.  पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना बातमीदारामार्फत एका काळ्या रंगाच्या चारचाकीमध्ये अवैधरित्या गुटखा होत असून, आणि ती काही वेळातच सोलापुर - पुणे महामार्गाने येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ढवाण, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले आणि पोलीस हवालदार सतीश रजपुत यांनी थेऊर फाटा चौक परिसरात सापळा लावला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून सोलापुरच्या दिशेने पुण्याकडे (एमएच.१२ पी.एन. ५१८५ )जात असताना पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली. यावेळी  पोलिसांनी या चारचाकीत तपासणी केली असता एकुण अवैध गुटख्याने भरलेले १२ पोते दिसले. त्यात विमल पानमसाला गुटखा आढळून आला. त्यानुसार अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटक