शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कफ सिरपचा दोन लाखांचा साठा जप्त; एफडीएकडून तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:29 IST

कळव्यातील खारेगाव टोलनाका येथे कारवाई 

ठळक मुद्देकोडीन फॉस्फेटयुक्त कफ सिरपचा नमुना हा चाचणी व विश्लेषणासाठी वांद्रे येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.पुढील कारवाई करीत हा साठा घेऊन जाणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.रात्री सव्वाआठच्या सुमारास आॅटोरिक्षातून हा साठा नेला जात असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तो जप्त केला

मुंबई - कळव्यातील खारेगाव टोलनाका येथून रविवारी फॉस्फेटयुक्त कफ सिरपचा दोन लाख आठ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. रात्री सव्वाआठच्या सुमारास आॅटोरिक्षातून हा साठा नेला जात असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तो जप्त केला. तसेच याची माहिती अन्न व सुरक्षा प्रशासनाला दिली. त्यानुसार त्यांनी पुढील कारवाई करीत हा साठा घेऊन जाणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना औषध विक्री परवाना, औषधांची खरेदी व विक्री याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना, बिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे औषधे गैरमार्गाने विक्री करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही औषधे घाटकोपर येथे पुरविण्यात येणार होती.अन्न व औषध प्रशासनाचे (ठाणे) सह आयुक्त (औषध विभाग) विराज पौनिकर यासंदर्भात म्हणाले, कोडीन फॉस्फेटयुक्त कफ सिरप हे खोकल्यावरचे औषध आहे. परंतु काही लोक याचा गैरवापर करतात. हे कफ सिरप जास्त प्रमाणात घेतल्यावर एक प्रकारची गुंगी येत असल्याने याचा वापर नशेसाठीही केला जातो. औषधाचा साठा रिक्षामधून नेत असताना ठाणे पोलिसांनी पकडला. त्यानंतर पोलिसांनी एफडीएला माहिती दिली. औषधाचा साठा असल्यामुळे एफडीएने तिघांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोडीन फॉस्फेटयुक्त कफ सिरपचा नमुना हा चाचणी व विश्लेषणासाठी वांद्रे येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

...त्यानंतर होणार पुढील कार्यवाहीऔषध नियंत्रण प्रयोगशाळेकडून नमुना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यावर व अमलीपदार्थविरोधी पथक यांच्याकडून केलेल्या तपासासंदर्भात माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुढील कार्यवाही करण्यात येईल. - डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व सुरक्षा प्रशासन.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागPoliceपोलिस