शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख घेऊन सहा लाखांच्या दिल्या नकली नोटा; तीनपट पैशांचे दाखविले आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:15 IST

Crime News : या घटनेप्रकरणी चार दिवसांनंतर सोमवारी भैय्या महाजन (रा. भडगाव) याच्यासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव : तीनपट पैसे देण्याचे आमिष दाखवून नथ्थू काशिनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर-फागणे, ता. जि. धुळे) यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन त्या बदल्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या सहा लाखांच्या नोटा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १८ मार्च रोजी अजिंठा चौकात घडलेल्या या घटनेप्रकरणी चार दिवसांनंतर सोमवारी भैय्या महाजन (रा. भडगाव) याच्यासह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नथ्थू कोळी हे चालक म्हणून काम करतात. २६ फेब्रुवारी रोजी मित्र वाल्मीक शिवाजी पाटील हा कोळी यांच्याकडे आला. पैसे तिप्पट करणाऱ्या व्यक्तीची माहिती भडगावचा शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक भैय्या महाजन याच्याकडे आहे, असे सांगितले. त्यानंतर १५ दिवसांनी पाटील याने फागण्याच्या पेट्रोल पंपाजवळ भैय्या महाजन याची भेट घालून दिली. तेव्हा त्याने तिप्पट पैसे करून देणारा माणूस माझा ओळखीचा आहे, असे सांगून कोळी यांच्याकडून १० हजार रुपये घेतले. त्या बदल्यात ३० हजार रुपये आणून देतो, असेही आमिष त्याने दाखविले.

भुसावळला केली नोटांची खात्री१४ मार्च रोजी एका व्यक्तीने कोळी यांना फोन करून तुमचा नंबर भैय्या महाजन याने दिला असून पैशाबाबत सांगितले आहे, असे बोलून फोन कट केला. त्यानंतर कोळी यांनी भैय्या महाजनला फोन केला; परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोळी वाल्मीक याला घेऊन भडगावला गेले. तेथे त्यांची रुग्णालयात भेट झाली. त्याने तिप्पट पैसे करणारा माणूस जळगावला आहे, तुम्ही तेथे जा. तो तुम्हाला काही नोटांचे नमुने दाखवले, असे त्याने सांगितल्याप्रमाणे दोघं जण जळगावात आले. 

संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने भुसावळला बोलावले. त्यानुसार कोळी व वाल्मीक पुन्हा भुसावळला गेले. तेथे त्याची भेट झाल्यावर त्याने पाचशे रुपयांच्या दोन, दोनशे रुपयांच्या दोन व शंभराच्या तीन नोटा नमुना म्हणून दाखविल्या. त्या नोटा खऱ्या असल्याची खात्री पटल्यावर दोघं जण घरी परत आले. त्याचदिवशी संध्याकाळी संबंधित व्यक्तीने फोन केला व दोन लाखांपेक्षा कमी रकमेवर तीन पट रक्कम मिळणार नाही, असे सांगून तुम्ही दोन लाख रुपये आणा आणि सहा लाख रुपये घेऊन जा, असे सांगितल्याने १८ मार्च रोजी त्याने पैसे घेऊन बोलावले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव