शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

नागपुरात भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू : संतप्त जमावाने ट्रेलर पेटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:12 IST

पल्सरवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना भरधाव ट्रकचालकाने मागून धडक मारली. अपघात झाल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरवरील तरुणांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देएक गंभीर : कळमना उड्डाणपुलावर भीषण अपघात : पोलिसांनी चालविल्या लाठ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पल्सरवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना भरधाव ट्रकचालकाने मागून धडक मारली. अपघात झाल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरवरील तरुणांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली उड्डाणपुलावर रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने घटनास्थळी उभा असलेला एक ट्रेलर पेटवून दिला तर, जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.विनोबा भावेनगरातील रहिवासी देवलाल रुमलाल शाहू त्याचे मित्र कमलेश संतोष महामल्ला (वय २०) आणि रोहित आनंद काटेकर (वय २६) यांच्यासह पल्सरवर बसून रविवारी रात्री घराकडे येत होते. चिखली उड्डाणपुलावर विटाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर आरजे ०७/ जेबी ५०८५ च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून देवलाल शाहूच्या पल्सरला मागून जोरदार धडक मारली. अपघात घडल्यानंतरही आरोपी ट्रकचालकाने वाहन न थांबवता पल्सरला तसेच खेचत पुढे नेले. त्यामुळे देवलाल शाहू आणि कमलेश महामल्लाचा जागीच मृत्यू झाला तर रोहित काटेकर गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील तसेच परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी तेथे तोडफोड सुरू केली. बाजूला असलेल्या एमएच २७/ डीएक्स २७५२ क्रमांकाचा नादुरुस्त ट्रेलर उभा होता. त्याला संतप्त जमावाने पेटवून दिले. दरम्यान, माहिती कळाल्यानंतर कळमना पोलीस तेथे पोहचले. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तणावात जास्तच भर पडली. माहिती कळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. याप्रकरणी देवलाल शाहूचे मोठे बंधू खेमलाल रुमलाल शाहू (वय ३०, रा. विनोबा भावेनगर) यांची तक्रार नोंदवून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.परिसरात शोककळादेवलाल यांच्यापरिवारात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी सुभद्रा तसेच राधे, संजू, रुही नामक मुले आहेत. तोच घरातील कमावता होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कमलेश त्याचे आजोबा आणि काकांसोबत राहायचा. या दोघांच्या मृत्यूने विनोबा भावेनगरात तीव्र शोककळा पसरली आहे.जमावावरही गुन्हे दाखलकळमना मार्केटमध्ये ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नेहमी अवजड वाहने येतात. परप्रांतातून येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असतो. त्यामुळे कळमना, यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच अपघात घडतात. कळमन्यात तर दिवसभरात अनेकदा ठिकठिकाणी जाम लागतो. हा धोकादायक प्रकार कळमना पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रविवारी रात्री अपघातानंतर जमावाने कळमना पोलिसांचा जोरदार निषेध केला. परिणामी कळमना पोलिसांनी दोषी ट्रकचालकासोबतच ट्रेलर पेटवून देणाऱ्या तसेच पोलिसांना विरोध करणाऱ्या जमावाविरुद्धही विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. पोलिसांनी लाठीमाराचा मात्र इन्कार केला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू