शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात पोलिसांना दमदाटी करण्याच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:48 IST

बॅनर लावण्यावरुन तसेच वाहनचालकाला थांबविल्याच्या कारणावरुन अशा दोन घटनेत तिघा जणांनी पोलिसांना दमदाटी केली.

पुणे : बॅनर लावण्यावरुन हटकले तसेच वाहनचालकाला थांबविल्याच्या कारणावरुन दोन घटनेत तिघा जणांनी पोलिसांनी दमदाटी करुन शासकीस कामात अडथळा आणण्याच्या घटना गुरुवारी घडल्या़. पहिल्या घटनेत येरवडा पोलिसांनी दत्ता पोळ (रा़. मंगळवार पेठ) आणि निता आडसुळ (रा़. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत पोलीस हवालदार के़ एम़ शेख यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. शेख हे बुधवारी रात्री पर्णकुटी पोलीस चौकीत अंमलदार म्हणून काम करत होते़. मध्यरात्री बाराच्या सुमारास पर्णकुटी चौकी समोरील चौकात लोक फ्लेक्स लावत असल्याचे दिसल्याने चौकीचे मार्शल बारोटे व खरात यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायला सांगितले़. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते बॅनर्स लावत असल्याचे दिसले़. त्यांना तुमच्याकडे परवानगी आहे का, परवानगी नसेल तर बॅनर्स लावू नका, असे सांगितले़. तेव्हा दत्ता पोळ व निता आडसुळ हे पर्णकुटी पोलीस चौकीत आले व मार्शल समजावून सांगत असताना त्यांना दमदाटी करुन शेख व इतरांनी त्याचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला़. दुसरी घटना शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली़. शिवाजीनगर पोलिसांनी वाहनचालक वैजनाथ नामदेव गाडेकर (वय २७, रा़. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याला अटक केली आहे़. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार डी़. पी़. गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. गायकवाड यांनी गाडेकर याची गाडी थांबविली़. त्यावरुन त्याने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन गायकवाड यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली़. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस