शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

दोनशे पत्रकांतून झाला हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:40 IST

मृतदेहाची ओळख पटवत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

ठळक मुद्देदारू पिताना झालेल्या भांडणातून मित्र शिवानंद बसवराज कटनळळी उर्फ शिवा उर्फ राज (३५), राजा यांनी त्याला जिवे मारल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाचा फोटो आणि वर्णनाची दोनशे पत्रके छापून मजूर मोठ्या प्रमाणात असतात तेथे लावली.

मुंबई - वाडीबंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा डोंगरी पोलिसांनी केला. हाती कुठलेही पुरावे नसताना, अंगकाठीवरून तो कामगार असल्याच्या शक्यतेतून मृतदेहाचे फोटो आणि वर्णनाची दोनशे पत्रके मुंबईतील प्रमुख ठिकाणी लावली. यातूनच मृतदेहाची ओळख पटवत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.२५ मार्चला रात्रीच्या सुमारास ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. अंगकाठीवरून तो मजूर असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर भागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे आणि तपास पथकाने शोध सुरू केला. मृतदेहाचा फोटो आणि वर्णनाची दोनशे पत्रके छापून मजूर मोठ्या प्रमाणात असतात तेथे लावली. तपासाअंती पथकाने त्याची ओळख पटवली. अब्दुल रेहमान असे त्याचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी असल्याचे समजले. दारू पिताना झालेल्या भांडणातून मित्र शिवानंद बसवराज कटनळळी उर्फ शिवा उर्फ राज (३५), राजा यांनी त्याला जिवे मारल्याचे निष्पन्न झाले. शिवानंदला पोलिसांनी अटक केली. तर राजालाही रात्री उशिरापर्यंत अटक होईल, असे डोंगरी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस