शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिघीत दरोड्याच्या तयारीतील पाच जणांकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:44 IST

निवडणूक विभागातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी करण्यात येत आहे

पिंपरी : दिघी येथे दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मॅग्झिन चौकात बुधवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अशी तपासणी करत असताना भरारी पथकास संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार चाकीचा चालक केशव लक्ष्मण सूर्यवंशी (वय २४ , रा.खंडोबामाळ, नारायणनगर, फुरसुंगी, पुणे), मनोज आत्माराम थिटे (वय २८ , रा. हडपसर, पुणे) रणजित शरदचंद्र लोखंडे (वय २४ , रा. दत्त मंदिराजवळ, हडपसर, पुणे), आकाश सीताराम चव्हाण (वय २७ , रा. करंजपेठ, सातारा), भागवत लिंबाजी कुंभारे (वय १९ , रा. नारायणनगर, खंडोबामाळ, फुरसुंगी, पुणे) यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. निवडणूक विभागातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी करण्यात येत आहे. भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी आळंदी -भोसरी रस्त्यावरून पांढ-या रंगाची चारचाकी (एमएच ०४. ईक्यू. १४८६) पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. पथकातील कर्मचा-यांना संशय आल्याने त्यांनी चारचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारचाकी थांबली नाही. त्यामुळे पथकाने अन्य सहका-यांच्या मदतीने चारचाकीला चौकात अडविले. चारचाकीत चालकासह पाच जण होते. त्यांचा संशय आल्याने पथकाने दिघी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार दिघी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चारचाकीतील पाचजणांची चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे, लोंखंडी रॉड, लाकडी दांडके, मिरची पुड, सुरी, नायलॉन दोरी असा माल मिळून आला.

भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक विभागातील भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र टिके, भाऊसाहेब पाटील, आनंद कापुरे, सुभाष डमाळ, दिलीप खंदारे, पोलीस नाईक दिपाली सुरकुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन राउळ, सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे आदींनी कारवाई केली.

टॅग्स :dighiदिघीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस