शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरात माथाडी संघटनेच्या पदाधिका-यावर दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी केला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:56 IST

बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात  सकाळी दहाच्या सुमारास जगदिश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेले दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देबदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले

बदलापूर- गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. मात्र सुदैवाने हल्लोखारांचे पिस्तुल न चालल्याने कुडेकर बचावला. मात्र यावेळी एक गोळी हवेत चालल्याने आसपासचा परिसरातील नागरिकांत एकच खळबळ उडाली.    तीन वर्षांपूर्वीच्या हत्या आणि गोळीबाराच्या प्रकरणानंतर बदलापूर शहरात शांततेचे वातावरण होते. या वातावरणाला मंगळवारी अचानक गालबोट लागले. बदलापूर पश्चिमेतील सानेवाडी भागात  सकाळी दहाच्या सुमारास जगदिश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनाप्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष असलेला कुडेकर सकाळी आपल्या कार्यालयात जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेले दोन हेल्मेटधारी बाईकस्वारांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तुल न चालल्याने त्यांचा डाव फसला. यावेळी कुडेकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने ते रमेशवाडीक़डे निघून गेले. मात्र काही सेकंदात ते पुन्हा कुडेकर यांच्याकडे आले आणि पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळीही गोळी सुटली नाही. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत तेथून पळ काढला. त्यामुळे कुडेकर थोडक्यात बचावला. याची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. जगदीश कुडेकर हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे. टोळी युध्दातुन हा प्रकार घडल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करणारे आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहे. दोघांनीही हेल्मेट झातल्याने त्यांची ओळख पटणो अवघड जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूरFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी