शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 12:12 IST

संतोष भवनच्या कारगिल येथील सार्वजनिक बाथरूमच्या समोरील रोडवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चाकूने तुफान हाणामारी झाली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- संतोष भवनच्या कारगिल येथील सार्वजनिक बाथरूमच्या समोरील रोडवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चाकूने तुफान हाणामारी झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटाविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन गंभीर जखमी हे मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलावरून दोन्ही गटात दोन ते तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच मागील भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री चाकूने हाणामारी झाली आहे. आरोपी रफिक, सलीम आणि त्यांच्या चार साथीदारांनी चाकूने वार करून दिपू उर्फ दीपक पाल याला जीवे ठार मारले. तर आकाश पाल आणि शुभम ठाकूर यांच्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले आहे. दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. पोलीस अंमलदार प्रमोद निवळे (३२) यांनी तक्रार देऊन हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

तर दुसऱ्या गटातील सलीमवर चाकूने वार झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणीही पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपाराPoliceपोलिस