शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी दोन गट भिडले; मध्यस्थ नगरसेवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:12 IST

सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

औंढा नागनाथ : येथे जुन्या व नवीन बसस्थानक परिसरात सध्या नवीन रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात एका नगरसेवकासह पाच जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात घडली. 

औंढा नागनाथ येथे आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने दिवसभर तणावाची परिस्थिती होती. त्यातच सायंकाळी सातच्या सुमारास जुन्या बसस्थानकापासून गावामध्ये जाणाऱ्या कमानीजवळ अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये एक फूलवाला हुतात्मा स्तंभाच्या जवळ दुकान टाकत असल्याने त्यास याठिकाणी जुने अतिक्रमण असलेल्या अर्जुन जाधव यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. ही घटना सोडविण्यासाठी गेलेल्या नगरसेवक विष्णू जाधव यांनाही यावेळी दुखापत झाली आहे. 

या घटनेमध्ये शेख रौफ शेख बशीर, शेख रहीम, गणेश जाधव, भीमराव जाधव व नगरसेवक विष्णू जाधव हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. शहरातील तणावाची स्थिती पाहता जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. 

यादरम्यान पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दोन समाजात निर्माण होणारा वाद संपुष्टात आला आहे. या घटनेनंतर शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करून झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु सध्या जरी वाद मिटला असला उद्या काय होते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे

विश्रामगृह ते कृउबा पर्यंत रस्ता रूंदीकरण औंढा येथे सध्या विश्रामगृह ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु यापूर्वीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक हीे स्वत:ची जागा असल्याचे समजून वषार्नुवर्षे त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. ४ रुंदीकरण कामात अनेकांची दुकाने उठली आहेत. परंतु नव्याने या रस्त्यालगत झालेल्या नालीचा आधार घेऊन काही फुटकळ व्यापारी सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण