शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

माहिती अधिकाराचा गैरवापर करणारे दोघे खंडणी स्वीकारताना अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 18:36 IST

एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघांना अटक

ठळक मुद्देप्रथम पाच लाखाची मागणी तडजोड करून १ लाखाची केली मागणी

गंगाखेड: माहिती अधिकाराचा गैरवापर करून खंडणी स्वीकारणाऱ्या दोघांना गंगाखेड पोलिसांनी सापळा रचून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी  ६ वाजता करण्यात आली. आरोपींनी पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. 

गंगाखेड येथील शासकीय धान्याच्या गोडाऊनचे तत्कालीन गोदामपाल गणेश उत्तमराव चव्हाण यांची बदली झाली. जून २०१८ या महिन्यात आश्रम शाळा योजनेतील धान्य पुरवठा वाहतुक परवाना व एच रजिस्टर तसेच परमिट गहाळ झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. दरम्यान, चाचण यांनी नवीन गोदामपाल मुंडे यांच्याकडे पदभार सोपविला. त्यानंतर माहिती अधिकाराच्या माध्यमातून पालम येथील सुदाम भिवाजी लोंढे यांनी गहाळ झालेल्या कालावधीतील एच रजिस्टरची मागणी केली. ही माहिती गणेश चव्हाण यांना कार्यालयातून समजली असता त्यांनी एच रजिस्टरचा पुन्हा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. 

दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी व हरवलेले एच रजिस्टर परत देण्यासाठी लोंढे यांच्यातर्फे प्रभू बालाजी राठोड यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधत प्रथम पाच व नंतर तीन लाख रुपयांची मागणी केली. गोदामपाल चव्हाण जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी याचा तपास करून पुढील कार्यवाही करण्याबाबत गंगाखेड पोलीस स्थानकास पत्र दिले. तपास सुरू असतानाच एच रजिस्टर व आश्रम शाळा धान्य पुरवठ्या संदर्भात कसलीही तक्रार करणार नाही व चौकशी थांबविण्यासाठी सुदाम लोंढे, प्रभु राठोड यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. 

खंडणी देण्याची मानसिकता नसल्याने गणेश चव्हाण यांनी पोलीसांना संपर्क साधून याची माहिती दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले, सपोनि भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, पोना. जोगदंड, प्रविण कांबळे, पो.शि. राजकुमार बंडेवाड, विष्णु वाघ यांनी सरकारी पंच सोबत घेऊन दि. १३ सप्टेंबर शुक्रवार रोजी सापळा लावून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या हॉटेलवर एक लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम स्वीकारताना सुदाम भिवाजी लोंढे ( रा. पालम ) व  प्रभु बालाजी राठोड ( रा. चाटोरी ता. पालम ह.मु. व्यंकटेश नगर गंगाखेड ) या दोघांना रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री उशीराने त्यांच्याविरुध्द शासकीय गोदामातील रजिस्टरची चोरी करून माहिती अधिकाराचा गैरवापर करीत खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, पो.ना. निलेश जाधव हे करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसparabhaniपरभणी