शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

122 करोड घोटाळ्यातील दोन कंत्राटदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:24 IST

विरार पोलिसांना सोयरसुतक नाही पण वसई न्यायालय मात्र गंभीर 

ठळक मुद्देतपास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद ?. उर्वरित 23 कंत्राटदारांना पोलीस कधी अटक करणार, पीडित कामगारांना खरोखरच न्याय देणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

 

नालासोपारा - 122 करोडचा घोटाळा केला म्हणून 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात 2 मार्च 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण 76 दिवस गुन्हा दाखल झाल्यावरही तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे कोणती कारवाई करत आहेत की आर्थिक व्यवहार करून घोटाळेबाज कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का आरोप कामगारांनी केला आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून 25 पैकी आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण या कंत्राटदाराला 22 एप्रिलला अटक केले व नंतर दोन दिवसात बालाजी सर्विसचे मंगरूळे बी. दिगंबरराव यांना अटक केले पण याची कुठेही वाच्यता किंवा याबाबत कोणालाही न सांगितल्याने तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांची तपासाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. उर्वरित 23 कंत्राटदारांना पोलीस कधी अटक करणार, पीडित कामगारांना खरोखरच न्याय देणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या संपुर्ण प्रकरणावर वसई न्यायालय गंभीर असून कोणत्याही कंत्राटदाराला व अटक असलेल्या दोघांना जामीन देत नसून विरार पोलिसांना मात्र काहीही सोयरसुतक नसल्याचे वाटते.मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने 122 करोड रुपयांचा घोटाळा विरार पोलिसांनी दाखल केला पण कारवाई होत नसल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होती. राजकीय वरदहस्त असलेले मातब्बर त्या 23 कंत्राटदारांना नक्की पोलीस अटक करणार का हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून विरार पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वसई विरार मनपा सोबत पत्रव्यवहार सुरू असून पुरावे गोळा करत असल्याचे कारण देत टाळाटाळ सुरू ठेवली आहे. सेवा कर, व्यवसाय कर, कामगार राज्य विमा योजना, कामगार आयुक्तालय यांच्याशी गुन्ह्या संदर्भात पत्रव्यवहार करणे गरजेचे होते ते केले आहे की नाही ? असे अनेक सवाल करून विरार पोलीस नेमके ह्या प्रकरणात काय करत आहे हा प्रश्न कामगारांना पडला आहे.नेमके काय होते प्रकरणवसई विरार मनपाच्या 3165 ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण 122 करोड च्या घोटाळ्यात 29 करोड 50 लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून 92 करोड 50 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाऱ्यांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.फरार असलेले 23 घोटाळेबाज ठेकेदारदिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्विस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई  इंटरप्राइजेस (विनोद पाटिल), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्ट्रिकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरुखकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस