शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलं झाली पोरकी...चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 20:49 IST

Murder And Suicide : याबाबत रविवारी शिरूर अनंतपाळ पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला.

ठळक मुद्देसाकोळ येथील सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे (३५) मनीषा सिद्धेश्वर शिंदे (३२) हे पती-पत्नी कामानिमित्त बाहेरगावी होते. मनिषा काही दिवसांपासून माहेरी राहत होती.

शिरूर अनतपाळ (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे शनिवारी रात्री घडली. याबाबत रविवारी शिरूर अनंतपाळ पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला.

पोलिसांनी सांगितले, साकोळ येथील सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे (३५) मनीषा सिद्धेश्वर शिंदे (३२) हे पती-पत्नी कामानिमित्त बाहेरगावी होते. मनिषा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. सिद्धेश्वर शिंदे याने गोड बोलून पत्नीला रोकडा सावरगाव येथून शनिवारी साकोळ येथे आणले. घरी आल्यावर रात्री दोघांमध्ये वाद झाला, यावेळी सिद्धेश्वर याने पत्नीला लाथा बुक्क्यांनी जोरात मारहाण केली त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यानेही स्वत: गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली. घटना घडली त्यावेळेस घरांमध्ये त्या दोघा व्यतिरिक्त कोणीही नव्हते,त्यामुळे सकाळी बराच वेळ ही घटना इतरांना समजली नाही. शिरूर अनंतपाळ पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंदही केली आहे. पती, पत्नीच्या मृतदेहाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नोतवाईकांना प्रेत ताब्यात देण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, तपघाले, तुमकुटे करीत आहेत.

दोन मुले झाली पोरकी...

मयत जोडप्यास दोन मुले आहेत. मोठा मुलगा यश शिंदे (१४) प्रेम शिंदे हा ११ वर्षांचा आहे. आई, वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने आता ही मुले पोरकी झाली आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे सर्वत्र हळहळ केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूlaturलातूरPoliceपोलिस