शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परळ येथे बसचालकाच्या पत्नीसह दोन मुलांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:35 IST

महिलेने मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली

 

मुंबई - परळ  येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या कामेरकर कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल सकाळी राहत्या घरी रेवती कामेरकर (३७) या महिलेने मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तसेच १६ आणि ४ वर्षाच्या मुलांना विष दिले. या तिघांचे मृतदेह शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरातून पोलिसांनी बाहेर काढले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बेस्टचे चालक म्हणून काम करणारे संदीप कामेरकर हे काल सकाळी ८ वाजता नोकरीसाठी निघाले. त्यांनतर काही कामानिमित्त त्यांनी घरी पत्नी रेवतीला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल कोणी रिसिव्ह करत नसल्याने संदीप यांनी शेजाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन पहिले असता घराचा दरवाजा बंद असल्याने कोणी उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी संदीप यांना याबाबत माहिती दिली. ही घटना काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर संदीप यांनी भोईवाडा पोलिसांना पाचारण केले. नियंत्रण कक्षास देखील कॉल करून कळविण्यात आले. त्यांनतर घटनास्थळी भोईवाडा पोलिसांचे पथक आले. अगोदरच संदीप यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला होता. रेवती यांनी पंख्याला गळफास लावण्याआधी १४ वर्षाच्या शुभम आणि ४ वर्षाच्या रिषाला विष दिले होते. शुभमचा मृतदेह बिछाण्यावर तर रिषाचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या पोलिसांना आढळला. पंख्याला गळफास घेतलेला रेवती यांचा मृतदेह पोलिसांनी पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळी तीन सुसाईट नोट सापडल्या. एक पोलीस, भाऊ आणि तिसरी पतीच्या नावाने मायग्रेनचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलेल्या या तीन सुसाईट नोट पोलिसांना सापडल्या. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस