चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 11:40 PM2022-06-28T23:40:37+5:302022-06-28T23:40:54+5:30

सहाय्यक फौजदार अनिल अहिरे आणि पोकॉ. शैलेंद्र पाटील अशी या पोलिसांची नावे आहेत.

Two Chalisgaon policemen arrested for accepting bribe of Rs 4,000 | चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक 

चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक 

Next

चाळीसगाव जि.जळगाव  : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्‍यास चार हजारांची लाच घेताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.   मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. 

सहाय्यक फौजदार अनिल अहिरे आणि पोकॉ. शैलेंद्र पाटील अशी या पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मुलीचा छळ केल्याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासह चार्जशीट पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच या दोन पोलिसांनी  मागितली होती. चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रार करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव व कर्मचार्‍यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Two Chalisgaon policemen arrested for accepting bribe of Rs 4,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस