शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २ दलालांना अटक, महिलेची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: January 11, 2023 17:25 IST

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: एका महिलेची सुटका

जितेंद्र कालेकर

ठाणे: अंबरनाथमध्ये बदलापूर रोड भागात काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाºया सोनू काझी (४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.     अंबरनाथमधील बदलापूर रोड भागातील रिलायन्स मार्केट परिसरात दोघे दलाल हे काही महिलांकडून शरिर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे, अंमलदार आर. व्ही. कदम, व्ही. बी. यादव  आणि के. डी. लादे आदींच्या पथकाने १० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथच्या बदलापूर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून सोनू काझी या दलालाला गाठले. त्याने पाच हजारांमध्ये एका महिलेचा सौदा केला. ही २५ वर्षीय महिला तिथे आल्यानंतर तिला यातील तीन हजार रुपये देण्यात आले. तर एक हजार रुपये सोनूने स्वत:कडे ठेवून उर्वरित एक हजार रुपये गगन शर्मा या त्याच्या साथीदार रिक्षा चालकाला दिले. या बनावट गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकून सोनू आणि गगन शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनाही अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे करीत आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस