गुरुग्राम - नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देश २०२० चे स्वागत करत असताना दुसरीकडे कासन गावातील अरवली येथे धक्कादायक घटना घडली आहे. १७ वर्षीय मित्रांसोबत नववर्षानिमित्त पिकनिकसाठी गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे .ही धक्कादायक घटना हरयाणातील गुरुग्राममधील मानेसर टाउनच्या कासन गाव येथील असल्याचं समजतं आहे. १६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या १७ वर्षीय मित्रासोबत अरवली येथील डोंगरळ भागात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दोन नराधमांनी तिच्यावर नजर पडली आणि तिचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
पिकनिकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 21:13 IST
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे .
पिकनिकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार
ठळक मुद्देकुमारने मुलीला गंभीर परिणाम होईल अशी धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना हरयाणातील गुरुग्राममधील मानेसर टाउनच्या कासन गाव येथील असल्याचं समजतं आहे.