शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: May 3, 2023 17:28 IST

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते.

प्रदीप भाकरे 

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या मध्यप्रदेशमधील एका सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ मे रोजी शिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहिरम मार्गावरून अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राकेश उर्फ पप्पू मधू बिसोने (२२) रा. जामझिरी, मध्यप्रदेश असे अटक चोराचे नाव आहे.             

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपास करीत होते. तपासादरम्यान दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मध्यप्रदेश येथील राकेश उर्फ पप्पू याचा हाथ असल्याचे समोर आले. तो सद्यस्थितीत दुचाकी चोरीच्या प्रयत्नात शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहितीही पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने बहिरम मार्गावर सापळा रचून राकेश उर्फ पप्पूला अटक केली.अकोला जिल्ह्यातही मारला हात

चौकशीदरम्यान त्याने दर्यापूर व तिवसासह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पुढील कारवाईकरिता त्याला दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, राहुल सोलव, चेतन गुल्हाने, सागर धापड यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस