शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फिल्मी स्टाईलने तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 22:14 IST

कापूरबावडी पोलिसांची कारवाई: तलवारही केली जप्त

ठळक मुद्देअक्षय राणे (24, रा. मनोरमानगर, ठाणे)  आणि प्रथमेश शामसुंदर राणे या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.यातील दोघांवर आर्म अ‍ॅक्टनुसार तर उर्वरित दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे - फिल्मी स्टाईलने तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे परमेश्वर राठोड (32, रा. मनोरमानगर, ठाणे) या तरुणाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी त्याच्यासह चौघांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील दोघांवर आर्म अ‍ॅक्टनुसार तर उर्वरित दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मनोरमानगर येथे राठोड याच्या वाढदिवसानिमित्त 13 जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी राठोड याने तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. या भन्नाट कार्यक्रमाची मोबाईलवरील क्लिप ठाणे शहरात मोठया प्रमाणात व्हायरल झाली होती. शिवाय, त्याचे फेसबुक लाईव्ह देखील करण्यात आले होते. याचीच गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने 14 जानेवारी रोजी परमेश्वर राठोड आणि किरण धावडे (23, रा. दोघेही मनोरमानगर, ठाणे) या दोघांविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करुन त्यांना 15 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ही तलवारही जप्त करण्यात आली आहे. अक्षय राणे (24, रा. मनोरमानगर, ठाणे)  आणि प्रथमेश शामसुंदर राणे या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसthaneठाणे