शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:35 IST

हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न

पिंपरी : हौसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ४० हजारांच्या तीन दुचाकी जप्त केल्या. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली. किरण ऊर्फ दाद्या गौमत शिंदे (वय २३, रा. आदर्शनगर, पाचपीर चौक, काळेवाडी, मुळ रा. गांधीनगर, पिंपरी), सुनील मल्हारी तलवारे (वय ३२, रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल राजन सांगुळे (वय २०, रा. मिहीर अपार्टरमेट, सुखवानी पार्क, अजमेरा, पिंपरी) यांनी दि. ०९ जून रोजी रात्री साडेआठ ते १० जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांची दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी हर्षल सांगुळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यावेळी पथकातील पोलीस गस्तीवर असताना टेल्को रोड, चिंचवड येथे नवीन पुलाजवळ एका दुचाकीवरून आरोपी शिंदे व तलवारे हे दोघे भरधाव केएसबी चौकाच्या दिशेने गेले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी अजमेरा, पिंपरी येथून चोरल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांनी हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन व चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याची उकल झाली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस कर्मचारी विवेक सपकाळे, गणेश भिसे, जावेद बागसिराज, श्रीकांत जाधव, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर, शहाजी धायगुडे, सोमेश्वर महाडिक, संजय कुºहाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक