शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जैन मंदिरात मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:06 IST

वालीव पोलिसांची कारवाई. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसईच्या सातीवली येथील जैन मंदिरात ३१ डिसेंबर २०२० रोजी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास देवांच्या ११ मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोरीची घटना मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणी वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देवांच्या मूर्ती चोरणाऱ्या नवी मुंबईच्या नेरुळ येथे राहणारे दोन आरोपींना सोमवारी अटक केली आहे.

वसईच्या सातीवली येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. ३१ डिसेंबरच्या पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील पाच लाख रुपये किमतीच्या दोन चांदीच्या व नऊ पंचधातूंच्या अशा देवांच्या ११ मूर्तींची चोरी केली होती. या चोरीची घटना कळल्यावर वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाल्याने सीसीटीव्ही ताब्यात घेतले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने नवी मुंबईच्या नेरुळ येथे राहणारे सुभाष केवट (३५) आणि राजू वंजारी (३०) या दोन आरोपींना सोमवारी अटक केली आहे. 

दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या दोन्ही आरोपींकडून अजून देवांच्या मूर्ती मिळाल्या नसून त्या बिहारमध्ये असल्याचे सूत्रांकडून कळते.

टॅग्स :Policeपोलिस