शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 01:47 IST

टेम्पोमधून रक्तचंदनाची तस्करी करणाºया दोघांना मानखुर्द येथे अटक करण्यात आली आहे.

मुंबई : टेम्पोमधून रक्तचंदनाची तस्करी करणा-या दोघांना मानखुर्द येथे अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ७ चे पोलीस अधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानखुर्द येथे सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख रूपये किमतीचे एकूण १३४० किलो वजनाचे एकूण ५३ रक्तचंदनाचे लाकडी ओंडके हस्तगत करण्यात आले.२८ नोव्हेंबरला काही इसम मुंबईतल्या मानखुर्द येथे बेकायदा रक्तचंदनाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे पोलीस अधिकारी मनीष श्रीधनकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचला. काही वेळातच मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर संशयित टेम्पो पोलिसांना दिसला. पोलिसांनी तो थांबवून त्याची तपासणी केली. या वेळी पोलिसांना प्लास्टीक व खाकी रंगाच्या गोणीमध्ये गुंडाळून ठेवलेले ५३ लाकडी ओंडके आढळले.टेम्पोतील इसमांना याबद्दल विचारले असता त्यांनी हे रक्तचंदन असून ते मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या वेळी वनाविभागाच्या अधिकाºयांनी या लाकडी ओंडक्यांची पाहणी केली आणि ते रक्तचंदन असल्याचे पोलिसांना सांगितले. परदेशी निर्यात करण्याचा आणि विक्रीचा कोणताही परवाना नसूनदेखील बेकायदा वाहतूक करून रक्तचंदन जवळ बाळगल्याने तसेच रक्तचंदन ही सरकारी मालमत्ता असूनही दोन आरोपींनी त्याची चोरी केली. यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, पोलिस उपआयुक्त (प्र १) श्री अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त (डी पूर्व) शेखर तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गु.प्र.शा, गु.अ.वि. कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे व पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, स‘हाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तूद, आनंद बागडे आदींनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई