शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शकीलच्या नावाने धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 21:03 IST

पोलीस कोठडीत रवानगी

ठळक मुद्देआमीर  खान उर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके अशी अटक आरोपींची नावे आहेत.छोटा शकीलच्या खंडणीची रक्कम देत नसल्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

मुंबई - छोट्या शकीलच्या नावाने जोगेश्वरीतील एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला धमकावणाऱ्या दोघांना ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आमीर  खान उर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके अशी अटक आरोपींची नावे आहेत.तक्रारदार वसीम अजित खान हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून ते जोगेश्वरी येथील गुलशन नगर परिसरात राहतात. त्यांची खाजगी कंपनी असून कंपनीद्वारे घराची डागडुजी, रंगरंगोटी,लाद्या बसविणे, दरवाजा उघडणे,वॉल टाईल्स तसेच सुतार काम करण्याचे काम करण्यात येत होते. या कामासाठी कंपनीत सहा कर्मचारी काम करीत होते. त्यावेळी आरोपी आमीर खान उर्फ अम्मूभाय आणि दिनेश चंद्रकांत घोडके यांनी आरटीआय कार्यकर्ते असल्याचे सांगून तुम्ही महापालिकेची परवानगी घेतली का असा सवाल करून काम बंद पाडू असे धमकावले. अमीर याने आपण छोटा शकील टोळीसाठी काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर आक्टोबर महिन्यात पुन्हा फोनवर धमकावून पैशाची मागणी केली. पैसे नाही दिले तर हातपाय तोडू अशी धमकी दिली. इतकेत नव्हे तर छोटा शकीलला दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली होती. त्यावेळेस तक्रारदाराने २२ हजार रुपये रोख देऊन सुटका केली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा ८० हजार रुपये घेतले. नोव्हेंबर महिन्यात तक्रारदारांचे अजित ग्लासमध्ये दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरु होते. यावेळीही अमीर आणि दिनेश आले. छोटा शकीलच्या खंडणीची रक्कम देत नसल्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

बांधकाम अनधिकृत असून त्याची तक्रार महापालिकेकडे करून बांधकाम तोडू असा दम दिला. त्यानंतर पुन्हा या दोन आरोपींनी महापालिकेत तक्रार न करण्यासाठी पैश्याची मागणी करत धमकावले. अखेर वारंवारच्या धमकीसत्राला कंटाळून तक्रारदार वसीम यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांना खंडणी घेताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी दोघांकडून एक फॉर्च्युनर कार, खंडणीची रक्कम आणि शस्त्र हस्तगत केले आहे. या दोन आरोपींची मागील तीन ते चार वर्षात छोटा शकीलच्या नावाने मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :ArrestअटकExtortionखंडणीPoliceपोलिसChhota Shakeelछोटा शकीलMumbaiमुंबई