शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला १३ लाखांना गंढविणाऱ्या दोघांस राजस्थानमधून अटक; गोवा सायबर विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 21:21 IST

खरोखरच बँकेचे अधिकारी असल्याचे त्या महिलेला वाटले व तिने बँक खात्याची सर्व माहिती दिली.

पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करून फोनवरून महिलेकडून बँक खात्याची माहिती घेऊन १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवापोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे लखविंदर सिंग आणि दर्शन सिंग अशी असून ते राजस्थानमधील पाकिस्तान सीमेनजीक राहाणारे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक करून गोव्यात आणले आहे. त्यांच्याकडून बँकेचे पासबूक , सीमकार्ड एटीएमकार्र्डे वगैरे जप्त करण्यात आली आहेत.

तक्रारदार महिला ही उत्तर गोव्यातील असून तिने सायबर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या दोघापैकी एकाने तिला फोन करून स्वत: बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यापूर्वी त्यांनीच फोन करून बँकचे डिटेल्स कुणालाही देऊ नका, तुमची फसवणूक होवू शकते असे सांगून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

 त्यामुळे हे खरोखरच बँकेचे अधिकारी असल्याचे त्या महिलेला वाटले व तिने बँक खात्याची सर्व माहिती दिली. तसेच नेटबँकींग करताना लागणारी गोपनिय माहितीही सांगून टाकली. नंतर  तिच्या बँक खात्यातून १२,७६,६१० रुपये काढले गेल्याचा तिला मेसेज आला व नंतर बँकमध्ये जाऊन तिने खात्रीही करून घेतली. त्यामुळे घाबरलेली ही महिला १८ जून रोजी सायबर पोलीस विभागात गेली आणि या प्रकरणात तक्रार नोंदविली.

सायबर पोलीस विभागाने या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. त्य महिलेला ज्या क्रमांकावरून फोन आला त्या क्रमांकाच्या आधारावर चालविलेल्या तपासानुसार ते राजस्थानात असल्याचे त्यांना आढळून आले. एक पथक गोव्याहून राजस्थानात दाखल झाले. राजस्थान पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडून त्यांनी गोव्यात आणले.

धाडसी निरीक्षक व उपनिरीक्षक

महामारीच्या या काळात मोठी जोखीम पत्करून  दूरवरच्या राज्यात जाणे आणि मोहीम फत्ते करून येणे ही अत्यंत धाडसी कामगिरी सायबर विभागाच्या दोन अधिकाºयांनी केली आहे. या विभागाचे निरीक्षक राजेश जॉब अणि उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे हे दोघे अधिकारी या मोहिमेवर निघाले होते.  सायबर विभागाचे अधीक्षक शोबित सक्सेना यांनी कौतुक  केले आहे. दरम्यान गोव्यात आल्यानंतर या दोन्ही पोलीस अधिकाºयांची तसेच दोन्ही संशयितांचीही कोविड चाचणी करण्यात आली. चौघांचाही अहवाल नेगेटीव्ह आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिस