शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चोर समजून हत्या प्रकरणात पुन्हा दोघांना अटक, अटक आरोपींची संख्या सहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:28 IST

पागलबाबा नगर येथे आपल्या मित्राचे घर शोधत असताना पंकज लांडगे व अविनाश किल्लो या दोघांना चोर समजून नागरिकांनी मारहाण केली होती.

चंद्रपूर : चोर समजून पागलबाबा नगर येथील नागरिकांनी गुरुवारी झाडाला बांधून दोघांना लाठीकाठीने केलेल्या मारहाणीत पंकज लाडगे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी सुखविंदर सिंग (४२) व परमिंदर सिंग (४४) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दाखल केल्यानंतर २३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या सहा झाली आहे.पागलबाबा नगर येथे आपल्या मित्राचे घर शोधत असताना पंकज लांडगे व अविनाश किल्लो या दोघांना चोर समजून नागरिकांनी मारहाण केली होती. त्यामध्ये पंकजचा मृत्यू झाला होता. तर अविनाश जखमी झाला होता. अविनाशनने रामनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सहा लोकांचे वर्णन केले होते. त्या आधारावर रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक मिलींद पारडकर यांच्या पथकांनी शुक्रवारी जनरल सिंग कष्टी (३५), सतपालसिंग मट्टू (३७), गुरुदित्ता मट्टू (२२), करणजित सिंग (१८) सर्व राहणार अष्टभुजा वार्ड यांना अटक केली होती. त्यानंतरही पोलिसांकडून इतर दोघांना शोध सुरु होता. शुक्रवारी रात्री  सुखविंदर सिंग व परमिंदर सिंग या दोघांना चंद्रपूरवरुन अटक केली होती. त्यांना २३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरिक्षक मिलींद पारडकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी