शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक : हिंजवडी पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:54 IST

पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वषार्साठी तडीपार गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

ठळक मुद्दे७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

हिंजवडी : पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वषार्साठी तडीपार गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या विविध घटनांचा तपास करत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई- बेंगळुरू महामार्गावर भुमकर चौक शनिमंदिर येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सतीश साहेबराव सावंत (वय ३०, रा. गणेशनगर, थेरगाव) तसेच विकास संभाजी तनपुरे (वय २०, रा. थेरगाव) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

तीन महिन्यांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी मिळून भुमकर चौक ते शनिमंदिर रोड दरम्यान दुचाकीवरून येऊन पहाटे पादचाऱ्यास अडवून दहशत निर्माण करत महागडा मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती. यामधील विकास तनपुरे यास यापूर्वी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. मात्र तो तडीपार मुदतीत पुणे शहरात वास्तव्य करून विविध गुन्हे करत होता. ताब्यात घेतलेल्या सराईतांकडे कसून चौकशी केली असता हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजून तीन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून ७५ हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल फोन, चार हजार रुपये रोख, स्टिलचा चाकू असा ७९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे)अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, महेश वायबसे, बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, रितेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस