मीरा रोड - सरंक्षित वन्यजीव असणाऱ्या मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्री करण्यासाठी भाईंदर पूर्वेला फाटक येथे आलेल्या दोघांना नवघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडिज कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना फाटक जवळ मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांच्या विक्रीसाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील व उपअधिक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेण्यात आली.फाटकाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच्या जवळ आणखी एक इसम येताच सापळा रचुन असलेले सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व टिकाराम थाटकर सह उप निरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे व महिला पोलीस सुतार यांनी दोघांना ताब्यात घेतले. बॅग उघडली असता आत कुरमुरे होते आणि त्याखाली मांडूळ जातीचे साप लपवून ठेवले होते.
अडीज कोटींचे दोन मांडूळ सापांची कुरमुऱ्यांमधून लपून तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:38 IST
या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडिज कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.
अडीज कोटींचे दोन मांडूळ सापांची कुरमुऱ्यांमधून लपून तस्करी
ठळक मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेण्यात आली.फाटकाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. बॅग उघडली असता आत कुरमुरे होते आणि त्याखाली मांडूळ जातीचे साप लपवून ठेवले होते.