उरण चिटफंड प्रकरणातील फरारी दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 16:06 IST2023-05-25T16:05:33+5:302023-05-25T16:06:11+5:30
मिळालेल्या माहितीच्या आधारावर उरण पोलिसांनी बुधवारी पाळत ठेवून सापळा लावला होता.

उरण चिटफंड प्रकरणातील फरारी दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
उरण : उरणमधील चिटफंड प्रकरणी मागील तीन महिन्यांपासून फरार झालेल्या दोन आरोपींच्या उरण पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (२४) शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उरणमधील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड प्रकरणी मुख्य आरोपी संजय गावंड याला त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांसह पोलिसांनी अटक केली होती.या प्रकरणातील अन्य दोन आरोपी घटनेपासून तीन महिन्यांपासून फरार होते.
बुधवारी (२४) जितेंद्र गावंड (३२) आणि निशाल गावंड ( २९) हे दोन्ही सह फरार आरोपी उरण येथील एपीआय टर्मिनल परिसरात येणार असल्याची खबर गुप्त माहितीगाराकडून उरण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर उरण पोलिसांनी बुधवारी पाळत ठेवून सापळा लावला होता. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात फरारी दोन्ही आरोपी अलगद सापडले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.