शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

साताऱ्यापाठोपाठ ठाणं हादरलं! भिवंडीत बारा हजार जिलेटीन कांड्या जप्त; गुन्हे शाखेचे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:31 PM

Gelatin sticks seized : या अवैध जिलेटीन साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी छापा टाकून अवैध जिलेटीन साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी - मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनस्फोटकांच्या कांड्या सापडल्या नंतर जेलिटीन स्फोटजकांच्या अवैध साठ्यांवर ठिकठिकाणी धाडसत्र सुरु झाली. सोमवारी भिवंडीतील कारीवली गावच्या हद्दीत असलेल्या खदानीच्या बाजूला असलेल्या कार्यालयात जिलेटिनच्या अवैध साठ्यावर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी धाड टाकून याठिकाणाहून तब्बल १२ हजार जिलेटीन च्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून एका वर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. 

               

गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे ( वय ५३ रा. कालवार ) असे अवैध जिलेटीन साठा साठविल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असतानाही सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे २५ किलो वजनाचे एकुण ६० बॉक्स त्यात एकुण ११,४०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकूण वजन १,५०० किलो असून डेक्कन पॉवर कंपनीचे ०३ बॉक्स त्या प्रत्येक बॉक्समध्ये २०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया अशा एकुण ६०० जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया ज्यांचे एकुण वजन ७५ किलो अशा एकुण १२ हजार जिलेटिन स्फोटक पदार्थाच्या कांडया व सोलर कंपनीचे २५०८ इलेक्ट्रीक डेटोनेटर व डेक्कन कंपनीचे ५०० इलेक्ट्रीक डेटोनेटर असे एकुण ३००८ इलेक्ट्रीक डेटोनेटर असा मोठया प्रमाणात जिलेटीन व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा एकुण २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थांचा साठा विना परवाना व बेकायदेशीरित्या साठविला असल्याचे आढळून आले. 

             नदीत ग्रॅनाईड आढळल्याने जिल्हा हादरला; दहशतवाद विरोधी पथक दाखल

या अवैध जिलेटीन साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी छापा टाकून अवैध जिलेटीन साठा जप्त केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत. तर घटनास्थळी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्यासह भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस ए इंदलकर, तसेच भिवंडी व ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिल्या आहेत. 

टॅग्स :ArrestअटकbhiwandiभिवंडीPoliceपोलिस