शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पत्नीसह मिलिंद दास्तानेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:42 IST

तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्यांच्या पत्नीस चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देपीएनजी ब्रदर्सची २५ लाखांची फसवणूक : २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे  : औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्यांच्या पत्नीस चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. या प्रकरणी ‘पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय ३४, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दास्ताने यांनी औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ सराफी पेढीमधील व्यवस्थापक  दास्ताने यांच्या असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्किटे व हिरे खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली. मात्र उर्वरित रक्कम व त्यावरील व्याज देण्यास ते टाळाटाळ करत होते. डोंबिवली येथील जागा विकल्यानंतर तुमचे पैसे देतो आश्वासन त्यांनी गाडगीळ यांना दिले होते, असे फिर्यादीत नमूद आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक करुन दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींची खरेच डोंबिवली येथे जागा आहे का? फिर्यादी यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ 

टॅग्स :Tujhyat Jeev Rangalaतुझ्यात जीव रंगलाCrime Newsगुन्हेगारीZee Marathiझी मराठी