शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘रिपब्लिक’च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची आज चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 2:28 AM

हजर राहण्यासाठी बजावले समन्स

मुंबई : बनावट टीआरपी रेटिंगद्वारे कोट्यवधींच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या आणखी तीन अधिकाऱ्यांना शनिवारी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना रविवारी सकाळी गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिव सुंदरम यांनी शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पत्राद्वारे असमर्थता दर्शविल्यानंतर अधिकाºयांनी इतरांकडे विचारणा करण्याचे ठरविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी मॅडिसन वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसारा यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली.

बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्यांना मदत करणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. याबाबत रिपब्लिकसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यासंबंधी चॅनेलच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ‘सीएफओ’ शिव सुंदरमला शुक्रवारी समन्स जारी केले होते. ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता शिव सुंदरम यांनी हजर न होता, पत्र लिहून मुदतवाढ मागितली. चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहोत, मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे, ती होईपर्यंत आमच्या कोणाकडे चौकशी करू नये, मी वैयक्तिक कारणाने मुंबईबाहेर असून केवळ १४ व १५ आॅक्टोबरला येणार असल्याचे कळविले. त्यामुळे अधिकाºयांनी रिपब्लिक चॅनलच्या अन्य तीन अधिकाºयांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

 

 

टॅग्स :Policeपोलिसarnab goswamiअर्णब गोस्वामी