शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:42 IST

कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने तीन मुलींची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे.

Tamil Nadu Crime: तमिळनाडूमध्ये हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणामुळे एका बापाने पोटच्या तीन मुलींच निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवलं. पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत बंद असल्याने दोघेही बचावले आहेत. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्यांनी घराकडे धाव घेतली आणि सगळा प्रकार समोर आला. चौघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यातील वेप्पागौंडनपुथुर गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीन तीन अल्पवयीन मुलींचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. याआधी त्याने आपल्या पत्नी आणि मुलाला वेगळ्या खोलीत बंद केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही भयानक घटना घडली. एम. गोविंदराज असे या आरोपीने प्रथम आपल्या मुली प्रतीक्षाश्री (१०), ऋतिकाश्री (७) आणि देवश्री (६) यांची निर्घृण हत्या केली आणि नंतर चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. 

हा सगळा प्रकार घडला त्यावेळी गोविंदराजची पत्नी भारती (२६) आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा अग्निस्वरन दुसऱ्या खोलीत होते. खोली बाहेरून बंद होती आणि ते बाहेर येऊ शकत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ते घटनास्थळी धावले. त्यांनी भारतीला बंद खोलीतून बाहेर काढले. जेव्हा ती पतीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला तिन्ही मुली मृतावस्थेत पडलेल्या होत्या. गोविंदराजचाही गळा चिरलेला होता.

पोलिसांच्या तपासात गोविंदराज एका खाजगी कंपनीत बोअरवेल मॅनेजर म्हणून काम करत होता. गोविंदराजने बोअरवेल फर्म सुरू करण्यासाठी  २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच त्याच्यावर १३.५ लाखांचेही कर्ज आहे. हे पैसे घर बांधण्यासाठी घेतले होते. त्याने त्याच्या आई आणि बहिणीच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था आणि महिला बचत गटांकडून पैसेही घेतले होते, जे तो परत करू शकत नव्हता. कर्ज फेडता येत नसल्याने तो तणावाखाली होता. याच मानसिक दबावामुळे त्याने हे भयानक पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक संकट आणि कर्ज फेडण्यात अपयश आल्यामुळे त्याने हे आत्मघातकी पाऊल उचलले असे दिसते, असं नामक्कल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस