शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

थरार : नागपूर जिल्ह्यात अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:52 IST

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कोराडी नजीकच्या बोखारा शिवारातील झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देबोखाऱ्याजवळ कारची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यूचांपा शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर ( कोराडी/उमरेड) : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. कोराडी नजीकच्या बोखारा शिवारातील झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. इकडे उमरेड-नागपूर महामार्गावर चांपा शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चंद्रभान मुकुंदराव इंगोले (६५), नंदकिशोर ऊर्फ गुड्डू व्यंकटेश पुसदकर (३८), चिंधबाजी काकडे (५२) तिघेही रा. बैलवाडा अशी बोखारा शिवारात झालेल्या मृतांची नावे आहेत. हे तिघेही बैलवाडा येथील रहिवासी आहेत. प्रीतेश शंकर जांभुळे (३३) रा. खंडाळा, ता. चिमूर असे चांपा शिवारात झालेल्या अपघातातील मृताचे नाव आहे.

कोराडीजवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कोराडी नाक्याकडून बैलवाड्याकडे परतत असताना दुचाकीवर असलेल्या तिघांना विरु द्ध दिशेने गुमथळ्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या वॅगनार कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांनाही जागेवरच प्राण गमवावा लागला. मृतांमधील चिंधबाजी काकडे हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत.ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटली असल्याने त्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी हे तिघेही कोराडीला आले होते. परतत असताना बैलवाड्याकडे जात असताना समोरून येणारी वॅगनार क्रमांक एम.एच.४९/यू.७७९४ च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर कारचालक सुनील मोरे (४०) हा पसार झाला. वाटसरूंनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर कोराडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत गावातील दीडशे ते दोनशे नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले होते. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता होती. अशा स्थितीत पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दुसरा अपघात उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या चांपा शिवारात घडला. येथे भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक प्रीतेश जांभुळे याचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रीतेश जांभुळे फार्मासिस्ट (एमआर) होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. यामुळे तो नागपूर दिघोरी परिसरात किरायाच्या खोलीत पत्नीसमवेत वास्तव्याला होता. मंगळवारी नागपूर येथून दुचाकीने (क्र. एमएच/४० एडी ९७२८) खंडाळा (ता. चिमूर) येथे निघाला. अशातच चांपा परिसरात असताना उमरेडकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची (एम.एच. ४०/ ए.के. ९८८६) जोरदार धडक लागली. दुचाकी चेंदामेंदा झाली असून ट्रकसुद्धा पलटला. ट्रकमध्ये डस्ट असल्याचे समजते. प्रीतेशचे वडील शंकर जांभुळे हे उमरेड येथील जीवन विकास विद्यालयात कर्मचारी होते.बैलवाड्यात शोककळाघटनेचे वृत्त कळताच बैलगाडा गावात शोककळा पसरली. चंद्रभान इंगोले यांच्या मुलाचा विवाह ठरलेला आहे. त्यामुळे घरी लग्नाच्या तयारीची लगबग होती. चिंधबाजी काकडे हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. त्यांची घरची स्थिती अत्यंत दयनीय आहे. नंदकिशोर पुसदकर हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. तिघांची स्थिती बेताची आहे. या तिघांच्या मृत्यूची बातमी बैलवाड्यात पोहोचली तेव्हा सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. रात्री अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत. तरुण, वृद्ध मंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सर्वांचा ताफा पोलीस स्टेशनकडे वळला.सामूहिकरीत्या होणार अंत्यसंस्कारया तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्व गाव शोकमग्न झाले आहे. घराघरातून रडण्याचाआक्रोश ऐकायला येत होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या, बुधवारी या तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपी सुनील मोरेविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, २७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.सुनील मोरे याचा याच परिसरात सिमेंट पाईप बनविण्याचा व्यवसाय आहे. मूळचा गुमथी येथील असलेला मोरे सध्या मानेवाडा येथे राहतो. तो आपल्या शेतीतील काम करून मानेवाडाकडे परतत असताना हा गंभीर अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू