शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घर पाडताना सापडला खजिना, सोन्याचे शिक्के गायब; ५ मजुरांसह ४ पोलिसांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 19:47 IST

येथील बाजार स्ट्रीटवरील एनआरआय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे.

जुन्या काळात तांब्याची भांडी, पितळाची भांडी आणि सोन्याची शिक्के होती. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा, असं बोललं जातं. मात्र, कधी कधी हे वाक्य खरं ठरल्याची जाणीवही काही घटनांमधून होते. गुजरातच्यानवसारी जिल्ह्याच्या बिलिमोरा येथील एका जुन्या घराचे पाडकाम करत असताना बांधकाम मजुरांना मोठं घबाड सापडलं. त्या मजुरांनी सापडलेल्या सोन्याच्या हंड्यातून १९९ सोन्याची नाणी चोरली होती. या नाण्यांवर किंग जॉर्ज पंचम यांची प्रतिमा होती. याप्रकरणी, ५ मजुरांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

येथील बाजार स्ट्रीटवरील एनआरआय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे. सध्या हवाबेन बलिया ह्या युकेतील लीसेस्टर शहरात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलिया यांनी ठेकेदार सरफराज करादिया आणि मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील रहिवाशी असलेल्या ४ मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवसारी पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी म्हटलं की, एका जुन्या घरातून सोन्याच्या शिक्क्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी घरमालकाकडून २१ ऑक्टोबर रोजी फिर्याद देण्यात आली. चोरी करण्यात आलेल्या सोन्याच्या शिक्क्यांची संख्या अद्याप नक्की सांगता येत नाही. आरोपींविरुद्ध ४०६ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घराचे पाडकाम करताना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून शिक्के चोरल्याचे कबुल केले. तर, वलसाड येथील ठेकेदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.     

दरम्यान, हे सोन्याचे शिक्के ८ ग्रॅम वजनाचे असून सन १९२२ सालचे आहेत. त्यावर, किंग जॉर्ज पंचम यांचे छायाचित्र आहे. बाजार भावाप्रमाणे या सोन्याच्या शिक्क्यांची किंमत ९२ लाख रुपये आहे. याप्रकरणी, मध्य प्रदेशातील ४ पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोन्याच्या शिक्क्यांमध्ये हिस्सेदारी घेतल्याचं आरोपींनी अलीराजपूरमधील सोंडबा पोलिसांना तपासावेळी सांगितले होते. सध्या पोलिसांनी जप्त केलेले सोन्याचे शिक्के न्यायालयाच्या ताब्यात आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे शिक्के सरकारला किंवा घरमालकाला देण्यात येतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :GoldसोनंGujaratगुजरातPoliceपोलिसnavsari-pcनवसारी