शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेजचा करुण अंत! बंद खोलीत आढळला दीपिकाचा मृतदेह; लग्नानंतर अवघ्या ९० दिवसांत पतीनेच संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:50 IST

प्रेमविवाह करून सुखाचे स्वप्न पाहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेचा तिच्या पतीनेच घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह करून सुखाचे स्वप्न पाहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेचा तिच्या पतीनेच घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रतनपूर भागात राहणाऱ्या दीपिका नावाच्या महिलेची घरगुती वादातून हत्या करण्यात आली असून, घटनेनंतर आरोपी पती शोएब फरार झाला आहे. विशेष म्हणजे लग्नाला अवघ्या तीन महिने उलटले असतानाच हा रक्ताळलेला खेळ खेळला गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लव्ह मॅरेज अन् संशयास्पद मृत्यू 

मृत दीपिकाने ऑक्टोबर २०२५ मध्ये सौरव उर्फ शोएब नावाच्या व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. या दोघांचा हा दुसरा विवाह असल्याचे समजते. रतनपूर येथील रामगंगा एन्क्लेव्हमधील एका फ्लॅटमध्ये ते आपल्या ४ वर्षांच्या मुलासह राहत होते. ३ फेब्रुवारीच्या सकाळपासूनच पती-पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून खटके उडत होते. सायंकाळच्या सुमारास जेव्हा घराचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा आत दीपिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

पोलिस येण्यापूर्वीच पती पसार 

घटनेची माहिती मिळताच पनकी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे. सायंकाळी जेव्हा वाद विकोपाला गेला, तेव्हा त्याने दीपिकाची हत्या केली आणि पोलीस पोहोचण्यापूर्वीच तिथून पळ काढला. घराचा दरवाजा आतून बंद होता, जो बळजबरीने तोडावा लागला.

तपासाची चक्रे वेगाने फिरली 

पोलीस उपायुक्त एस. एम. कासिम आबिदी यांनी सांगितले की, "हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मृत महिलेच्या आईची चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल."

आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना 

शोएबचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. अवघ्या तीन महिन्यांत प्रेमाचा हा असा भयानक शेवट झाल्याने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे. संशयाची सुई लव्ह जिहाद किंवा नाव बदलून केलेल्या फसवणुकीकडे तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Love marriage ends tragically: Wife murdered within 90 days by husband.

Web Summary : In Kanpur, a 29-year-old woman was murdered by her husband, Shoaib, just three months after their love marriage. Domestic disputes escalated, leading to the tragic event. Shoaib is absconding; police are investigating a possible 'love jihad' angle.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश